• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

जिल्हाधिकारी रोहन घुगे पीठासीन अधिकारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर निश्चित झाला असून, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यासंदर्भातील अधिकृत निर्देश दिले आहेत.

​नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष या पदांच्या निवडीकडे लागले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची या बैठकीसाठी ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सभेचे कामकाज पार पडल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल आणि इतिवृत्त महानगरपालिकेच्या नोंदवहीत नोंदवून तो प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.

​जळगावसह नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर महानगरपालिकांची निवड देखील ६ फेब्रुवारीलाच होणार असून, मालेगावसाठी ७ फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. जळगावच्या राजकीय वर्तुळात आता या निवडीवरून हालचालींना वेग आला असून, नव्या महापौरांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Tags: #elections#jalgaon_city#meyar#municipalcorporation
Next Post
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची 'खाऊ गल्ली'वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add