• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

अखेरच्या तासात केंद्रांवर उसळली गर्दी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 15, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने राबविलेले जनजागृती अभियान आणि विविध उपाययोजनांनंतरही जळगावकरांमध्ये मतदानाबाबत पुन्हा एकदा निरुत्साह दिसून आला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला असून शहरात एकूण ५३.५९ टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ५५.७७ टक्के होते, त्या तुलनेत यंदा मतदारांनी मतदानाकडे काहीशी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळाले.

​सकाळचा शुकशुकाट अन् दुपारची गर्दी..
​आज सकाळी ७:३० वाजता शहरातील विविध केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारपर्यंत मतदारांचा प्रतिसाद अत्यंत संथ राहिल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, दुपारी ३:०० वाजेनंतर परिस्थिती बदलली. ऊन कमी होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि केंद्रांवर अचानक गर्दी वाढली. या गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण आला.

​मतदानाची आकडेवारी काय सांगते?
​निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात एकूण २,३४,९९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात प्रामुख्याने पुरुष मतदारांनी आघाडी घेतली आहे.
​पुरुष मतदार: १,२२,८५८
​स्त्री मतदार: १,१२,१३३
​इतर: ०५

​वेळ संपली तरी रांगा कायम..
​मतदानाची अधिकृत वेळ संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या दोन तासांत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ५:३० वाजेपूर्वी जे मतदार केंद्राच्या आवारात दाखल झाले होते, त्या सर्वांना प्रशासनाकडून टोकन देऊन मतदानाची संधी देण्यात आली. यामुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री ६:३० ते ७:०० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाची आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

​निकाल कोणाच्या बाजूने?
​मतदानाचा टक्का २ टक्क्यांनी घसरल्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कमी मतदानाचा फटका नक्की कोणाला बसणार आणि फायदा कोणाचा होणार, याबाबतची गणिते आता मांडली जात आहेत. मतदानाचा टक्का घटल्यामुळे निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, संपूर्ण शहराचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.

Tags: #jalgaon_city#municipalcorporation#political
Next Post
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add