• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-२०२५’ उत्साहात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-२०२५’ उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन स्कूल चा ‘फाउंडर्स डे-२०२५’ उत्साहात झाला. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल निकेतन आणि विद्या निकेतनच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडविले. यावेळी उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, फरहाद गिमी, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन, अनुभूती बालनिकेतन आणि विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. ‘तेरा मंगल मेरा मंगल…’ या गीतावर अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन म्हणजेच दादाजी यांची भूमिका करणाऱ्या निवेदकाचे आगमन झाले. हा क्षण सोहळ्याचे आकर्षण ठरला. कीर्ती पगारिया, स्मिता काटकर यांनी भवरलाल जैन यांची जीवनदर्शन आपल्या प्रास्ताविकातून मांडले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘भारत प्यारा’ हे समूहगीते प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तसेच संस्कृत वर्णमाला गीत, कृष्ण, राम कथा सादरीकरण आणि ‘रामराज्य’ नाटिका यामुळे पौराणिक कथांचा उलगडा नाटिकांतून चिमुकल्यांनी केला. जीवनातील अध्यात्म, साधेपणा, भक्तीभाव आणि मानवी मूल्यांचे विद्यार्थ्यांनी अभिनयातून दर्शन घडवले. महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक उपस्थितांसमोर चिमुकल्यांनी उभी केली. कलेसह आरोग्याची जाण जपणारे सादरीकरण सुद्धा झाले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली. योगा, झुम्बा आणि ॲरोबिक्सच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीराचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

यावेळी अंबिका जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माळी रोपांची निगा राखतो, त्याप्रमाणे शाळेतील शिक्षक मुलांची निगा राखून त्यांना सुज्ञ नागरिक बनवतात. मुलांनी देखील नेहमी हसत खेळत राहावे, जिज्ञासू रहावे, प्रश्न विचारावे, असे आवाहन त्यांनी केले.

Next Post
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त जळगावात भव्य रॅली, रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त जळगावात भव्य रॅली, रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

ताज्या बातम्या

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group