• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

जळगाव, (प्रतिनिधी) : कोरोना काळात मोबाईलच्या जवळ गेलेल्या बालकांना मोबाईलपासून दूर नेवून त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या मातीचे संस्कार घडविण्यासोबत त्यांच्यात कलाभान वाढविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कार्यरत असून, विविध महोत्सव, उपक्रम व शिबिरांच्या माध्यमातून बालकांसाठी संपूर्णतः विनामूल्य काम करणारी बालरंगभूमी परिषद आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांनी केले. बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

बालरंगभूमी परिषदेमार्फत बालकांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा यासोबतच लोककलांची महती पोहचावी. या लोककलांचा त्यांनी अभ्यास करण्यासोबत त्याचा आनंदही घ्यावा या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी रंगमंचावर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत, प्रभारी प्रमुख कार्यवाह व जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ लोककलावंत जयश्रीताई पाटील, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह समूह लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक डॉ.सुचित्रा लोंढे, सचिन भिडे आदी उपस्थित होते.

उद्‌घाटनसोहळ्याचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. त्यानंतर उद्‌घाटक म्हणून बोलतांना ॲड.निलम शिर्के सामंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देत, पालकांना बालरंगभूमी परिषदेला सहकार्य करण्याचे तसेच बालकांनी बालप्रेक्षक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. आज दि.२८ नोव्हेंबर रोजी महोत्सवातील समूह लोकनृत्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणीत जिल्ह्यातील २४ विद्यालयातील २८० बालकलावंतांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, मोहित पाटील, सुदर्शन पाटील, पंकज बारी, हर्षल पवार आदी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Next Post
पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add