• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

​जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : थंड हवेमुळे प्रसिद्ध असलेल्या पाल परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच या भागाची सविस्तर पाहणी केली. त्यांनी पाल येथील गार्डन, वन उद्यान, विश्रामगृह, डॉरमेट्री आणि पर्यटक निवास यांसह वन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सातपुडा जंगल सफारीचा पाहणी दौरा करून तेथील सर्व सुविधा आणि चालू कामांचा सविस्तर आढावा घेतला.

​जिल्हाधिकाऱ्यांनी पाल परिसरात पर्यटनाची मोठी क्षमता असल्याचे या वेळी नमूद केले. गावापासून सहा किलोमीटर अंतरावर वन विभागाने सुरू केलेल्या सातपुडा जंगल सफारीतील कामांची त्यांनी विशेष पाहणी केली. या सफारीमुळे स्थानिक ग्रामस्थांना वन व्यवस्थापन समिती मार्फत उपलब्ध झालेल्या रोजगाराविषयी त्यांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.

​​पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या पुढील विस्तार आणि विकासासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच, जंगल सफारीतील मार्गदर्शक व्यवस्था, वाहतूक, सुविधा विस्तार, पर्यटकांसाठी सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन याबाबत काही सुधारणा सुचवून पर्यटन विकासाला गती देण्याचे निर्देश दिले.

यावेळी ​उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे प्रोजेक्ट ऑफिसर यावल यांच्यासह अन्य अधिकारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

Next Post
खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम

खाऱ्यापाडा शाळेत 'अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन' जनजागृती कार्यक्रम

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add