• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित

​जळगाव, (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर विद्यालयात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी एक तास विशेष ‘इंग्रजी वाचन उपक्रम’ उत्साहात राबविण्यात आला. सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

​कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या चरित्रातील प्रेरणादायी परिच्छेदाचे वाचन करून केली. यात तरन्नूम मुस्ताक तडवी, रोशन तुषार पाथरवट, तेजस्विनी संभाजी दांडगे, आरोही सतीश सोनार, कावेरी जगदीश पाटील यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित छोट्या इंग्रजी परिच्छेदांचे प्रवाही वाचन करून आपली भाषिक कौशल्ये प्रदर्शित केली.

​“Education for All”, “Respect Everyone” अशा संदेशपर छोट्या इंग्रजी घोषवाक्यांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा सन्मान केला. उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महात्मा फुले यांनी समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची दारे उघडली. त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. वाचनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि भाषिक कौशल्ये दोन्ही वाढतात.”

​या उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत वाचनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या आणि शिक्षणविषयक कार्याला उजाळा दिला

Tags: #aducetion#jalgaon_city
Next Post
संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद - ॲड.निलम शिर्के सामंत

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add