• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाच स्वीकारणाऱ्या सरपंच व दोन खाजगी इसमांविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई

जलजीवन मिशन कामाच्या हस्तांतरणासाठी ८०,००० रुपयांची लाच घेताना अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 8, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
लाच स्वीकारणाऱ्या सरपंच व दोन खाजगी इसमांविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा हस्तांतर करारनामा करण्यासाठी तक्रारदार शासकीय ठेकेदाराकडे एक लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८० हजार स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील सरपंच भानुदास पुंडलिक मते यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्यासह दोन खाजगी इसमांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ₹१,५०,२३,३२१/- च्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले होते. त्यांना या कामापोटी यापूर्वी ₹१,२७,२३,३२१/- मिळाले होते, परंतु उर्वरित अंदाजे ₹२३,००,०००/- चे अंतिम देयक प्रलंबित होते. हे देयक मिळवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांचा हस्तांतर करारनामा आवश्यक होता. तक्रारदार यांनी यासाठी सरपंच भानुदास पुंडलिक मते आणि ग्रामपंचायत सदस्याचे पती समाधान काशिनाथ महाजन यांची भेट घेतली असता, त्यांनी हस्तांतर करारनामा करून देण्यासाठी ₹१,००,०००/- लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ०६/१०/२०२५ रोजी ला.प्र.वि., जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, समाधान महाजन आणि सरपंच भानुदास मते यांनी ₹८०,०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

सापळा कारवाईत लाच स्वीकारताना पकडले:
दि. ०७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सापळा रचला. यावेळी सरपंच भानुदास मते आणि समाधान महाजन यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम संतोष नथ्थु पाटील याने तक्रारदार यांचेकडून ₹८०,०००/- लाचेची रक्कम स्वीकारली. एसीबीच्या पथकाने त्यांना लागलीच रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी भानुदास पुंडलिक मते (वय ४४, सरपंच), समाधान काशिनाथ महाजन (वय ३८, खाजगी इसम) आणि संतोष नथ्थु पाटील (वय ४९, खाजगी इसम) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ला.प्र.वि. जळगांवचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी त्यांच्या सापळा पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना. बाळु मराठे, पोकॉ. अमोल सुर्यवंशी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.


 

Next Post
डॉ.उल्हास पाटील यांनी क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांना दिला ‘संयम’ मंत्र

डॉ.उल्हास पाटील यांनी क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांना दिला 'संयम' मंत्र

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’
कृषी

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

November 13, 2025
स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य
आरोग्य

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य

November 13, 2025
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

November 13, 2025
जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण
खान्देश

जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

November 13, 2025
जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक
खान्देश

जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक

November 13, 2025
भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’
खान्देश

भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’

November 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group