जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये ३ जुलै, बुधवार पासून वाचन चळवळ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले.
या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, शाळेतील मराठी विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता आठवी पर्यंत च्या प्रत्येक मुलांमध्ये वाचन कौशल्य निर्माण करतानाच वयोगटांनुसार मुलांना लोकसहभागातून मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमास गती देण्यासाठी शाळांच्या वेळापत्रकात आनंदाचा तास सुरू करण्यात येणार आहे. असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.