• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुंड्यापाणी एसटी बस बंद; विद्यार्थ्यांची पायपीट!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
कुंड्यापाणी एसटी बस बंद; विद्यार्थ्यांची पायपीट!

जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील विद्यार्थ्यांना खराब रस्ते आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज ५-६ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. एसटी महामंडळाची बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कुंड्यापाणी ते बिडगाव रस्त्यावर पावसाने मोठे खड्डे पडले आहेत, तसेच झाडेझुडपांमुळे बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बस बिडगाव येथून पुढे जात नाही, अशी माहिती बस चालकांनी दिली आहे. अनेकदा बसच्या काचा फुटल्याने नुकसान भरपाई द्यावी लागते, असेही चालकांचे म्हणणे आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले कुंड्यापाणी गाव असल्याने परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी पायपीट करत शाळेत जातात. वेळेवर शाळेत पोहोचू न शकल्याने शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील मुसा तडवी यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने कुंड्यापाणी येथे दिवसातून किमान दोन एसटी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.


 

Next Post
मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add