• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला घरी परतताना विद्युत वायरला स्पर्श झाल्यामुळे त्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

अनिल भिला कोळी (वय २७, रा.धानोरा ता.चोपडा) तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ यांचेसह राहत होता. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शुक्रवारी जनावरांसाठी चारा घेण्याकरिता शेतामध्ये गेला होता. त्याच्यासोबत एक लहान बालक होता. चारा डोक्यावर घेऊन घरी परतत असताना विद्युत वायरचा त्याला स्पर्श झाल्याने, त्याच्या अंगात विद्युत प्रवाह शिरल्याने त्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली. अनिल कोळी याला तातडीने धानोरा उपकेंद्र व तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या वेळेला अनिल कोळी यांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात धानोरा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
माहेरून २५ लाख रुपये आणले नाही म्हणून पतीचे अनैसर्गिक कृत्य ; सासर्‍यासह नंदोईकडून बलात्कार

माहेरून २५ लाख रुपये आणले नाही म्हणून पतीचे अनैसर्गिक कृत्य ; सासर्‍यासह नंदोईकडून बलात्कार

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add