• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ताईनगर चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी ; आ. खडसेंनी मांडला लक्षवेधी सवाल !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगर चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी ; आ. खडसेंनी मांडला लक्षवेधी सवाल !

मुंबई, (वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा विचार असून भूसंपादनाबाबत याबैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रीय महामार्ग ७५३ एल, बोरगाव हुजूर ते मुक्ताईनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामातील भूसंपादन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याच्या मुद्द्यावर २ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

सदस्य एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. या चर्चेत आमदार परिणय फुके, सदाभाऊ खोत, भावना गवळी आदींनी सहभाग घेतला. बावनकुळे म्हणाले, याआधीच विधानसभेत उत्तर देताना स्पष्ट केले आहे की, भूसंपादन प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी राज्य सरकार घेत आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादन २०२२ मध्ये पूर्ण झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया २०२३ मध्ये सुरु करण्यात आली. या दोन टप्प्यांतील मोबदल्याच्या दरांमध्ये मोठा फरक आढळून आला असून, तो कशामुळे आहे, याबाबत तपास केला जात आहे.

भूसंपादनासंदर्भातील कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे खडसे यांनी नमूद केले आहे. गुजरातमध्ये लागू करण्यात आलेल्या ‘लँड पुलिंग’ पद्धतीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जमीन संपादनाचे धोरण अवलंबावे, असेही सुचवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळू शकेल, तसेच शासनाचा खर्चही कमी होईल. यावर २ एप्रिलच्या बैठकीत विचारविनिमय होईल. सध्या राज्यातील वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांसाठी विविध कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, नांदेड-जालना महामार्ग या प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. परिणामी, काही शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळतो, तर काहींना तुलनेत खूपच कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे एकसंध धोरण आखण्याची गरज असल्याचे मत काही सदस्यांनी मत व्यक्त केले.

Next Post
शेतकऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील घटना

शेतकऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add