• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील घटना

चोपडा, (प्रतिनिधी) : सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अडावद येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवल ताराचंद महाजन (५४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नवल महाजन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. नवल महाजन हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीसाठी त्यांनी अडावद विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. यावर्षी त्यांनी मक्याची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शेतातच सडले. पुढे त्यांनी उसनवारी करून रब्बी हंगामासाठी कांदा लागवड केली. मात्र, कांद्याच्या गडगडलेल्या किमतींमुळे त्यांचे सोसायटीचे कर्ज आणि इतर उसनवारीचे पैसे फेडणे शक्य होणार नाही, याची जाणीव झाल्याने ते मानसिक तणावात होते.

पुढील हंगाम आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. २६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
जीएमसीत गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ; ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

जीएमसीत गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ; ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group