• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खून प्रकरणी पतीला पुण्यातून अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
कौटुंबिक वादातून पत्नीच्या खून प्रकरणी पतीला पुण्यातून अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून हत्या करणारा संशयित पती अजीज सलीम शेख (वय ३५, रा. परळी, बीड, ह.मु. वरणगाव ता. भुसावळ)) याने रविवारी मध्यरात्री पत्नीचा निर्घृण खून करून पळ काढला होता. मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पुण्यात शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील एका वीटभट्टीवर सना अजीज शेख (वय २५) कुटुंबासह वास्तव्यास होती. तिचा पती अजीज शेख याला दारूचे व्यसन होते. तो वारंवार पत्नीवर अत्याचार करत असे. शनिवारी रात्रीही तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून अजीजने सनाचा गळा आवळून तिचा खून केला आणि पसार झाला झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध सुरू केला. खून करून फरार झालेल्या अजीज शेखचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास सुरू केला. अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वरणगाव पोलीस करत आहेत.

Next Post
बोदवड बस स्थानकावर तरुणाचा खिसा कापला ; ५० हजार लंपास

बोदवड बस स्थानकावर तरुणाचा खिसा कापला ; ५० हजार लंपास

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add