• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय योजनांचा माहिती मेळावा

हजारों नागरीकांनी घेतला लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2021
in जळगाव जिल्हा
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय योजनांचा माहिती मेळावा

जळगाव, दि. 15 – (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घेतली, त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार एम. के. पवार, गटविकास अधिकारी श्री. भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम. एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक एस. बी. पाटील आदि उपस्थित होते.

याठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर 28 विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती.

त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Next Post
प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

ताज्या बातम्या

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!
जळगाव जिल्हा

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

August 11, 2026
एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

August 11, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव जिल्हा

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जळगाव जिल्हा

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add