• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किरकोळ कारणावरून हाणामारी, तिघांना बेदम मारहाण

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
किरकोळ कारणावरून हाणामारी, तिघांना बेदम मारहाण

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथील माजी सरपंचाच्या घरासमोर उभी दुचाकी ट्रॅक्टर नेण्यास अडसर ठरत असल्याच्या रागातून हाणामारी झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टर चालकासह त्याच्या कुटूंबीयांनी घरात घूसून मारहाण केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चोपडा तालूक्यातील अकुलखेडा येथील शेतकरी आनंद लोटन चौधरी (वय-६६) हे गावचे माजी सरपंच आणि प्रतिष्ठीत ग्रामस्थ आहे. पत्नी मिनाबाई, मुलगा योगेश, अनंत अशांसह एकत्र कुटूंबात ते वास्तव्यास असून दोन्ही मुलं उच्च शिक्षीत असल्याने आधुनिक शेती करतात. त्यांच्याच घरासमोर रविंद्र पांडू पाटील यांचे घर असून त्यांनी घराशेजारीच ट्रॅक्टर लावण्याचे शेड तयार केले आहे. बुधवार दि. २६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास माजी सरपंच आनंद लोटन चौधरी यांच्या दाराशी दुचाकी उभी होती. त्याच वेळेस रविंद्र पाटिल हा ट्रॅक्टर(एम.एच.१९.सीसी ६१५) घेवुन गल्लीत आला.

दुचाकी काढण्यावरुन घराकडे पाहुन शिवीगाळ करत असल्याने, त्यास आनंद चौधरी यांनी, वाहन काढण्यासाठी चावी आणतो. थांब, असे सांगीतल्याचा राग येवून मिलींद रविंद्र पाटील, सागर रविंद्र पाटील अशा देाघा भावांनी विनाकारण शिवीगाळ करून घरात शिरकाव केला. आनंद चौधरी, मिनाबाई या वयोवृद्ध दाम्पत्यासह त्यांचा मुलगा योगेश यास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आनंद चौधरी यांच्या बरगड्यांना जबर दुखापत होवुन हात मुरगळला असून, योगेश चौधरी यांच्या हाताला दुखापत करण्यात आली. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींचा जबाब घेतल्यानंतर चोपडा पेालिसांत दिलीप रविंद्र पाटील, सागर रविंद्र पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक एम.डी. साळवे करत आहेत.

Next Post
आ.किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व.नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

आ.किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व.नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add