• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक ; एक ठार, एक जखमी

जळगावच्या ममुराबाद रस्त्यावरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक ; एक ठार, एक जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील ममुराबाद रस्त्यावर महाविद्यालयामध्ये जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण विद्यार्थी जागी ठार झाला आहे. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

फैजल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील यांच्यासह मास्टर कॉलनी येथे राहत होता. फैजल पटेल अरुणाबाई फार्मसी महाविद्यालय येथे तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. दरम्यान शनिवार दि.१ मार्च रोजी फैजल पटेल हा त्याचा वर्गातील मित्र वासिक खान युसुफ खान (वय २०) याच्यासोबत ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयामध्ये जात असताना ममुराबाद रोडवर बायपास रस्त्यावर अज्ञात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासिक खान हे गंभीर जखमी झाले.

त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याच्या मित्रांनी दाखल केले असता त्या ठिकाणी फैजल खान याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर वासिक खान याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महाविद्यालयीन तरुणाच्या मृत्यूमुळे मास्टर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर औरंगाबाद ग्रामीण येथे बदली

सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर औरंगाबाद ग्रामीण येथे बदली

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add