• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर औरंगाबाद ग्रामीण येथे बदली

फैजपूर उपविभागात गेल्या १४ महिन्यांपासून कार्यरत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर औरंगाबाद ग्रामीण येथे बदली

जळगाव, (प्रतिनिधी) : फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची औरंगाबाद ग्रामीण येथे पदोन्नतीवर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी उशिरा काढले आहे.

सन २०२० च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उप विभागात सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपीपदी नियुक्ती झाली होती. आयपीएस अन्नपुर्णा सिंह या कडक शिस्तीचा अवलंब करणा-या अधिकारी म्हटल्या जातात. महाराष्ट्र २०१९ च्या आयएएस बॅचचे अंकित (जिल्हा परिषद, जळगाव सीईओ) यांच्यासोबत अन्नपुर्णा सिंह यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे भारतीय पोलिस सेवा (कॅडर) नियम १९५४ चा नियम ५ च्या उप नियम (२) नुसार त्रिपुरा आणि महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने अन्नपुर्णा सिंह यांना त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात स्थानांतरीत करण्यात आले आहे.

दि.१५ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा सिंह यांची चोपडा उप विभागासाठी नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार त्या १८ डिसेंबर २०२३ रोजी हजर देखील झाल्या होत्या. दरम्यान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले होते. त्यात अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर येथे २२ डिसेंबर २०२३ रोजी बदली करण्यात आली होती. गेल्या १४ महिन्यापासून त्या फैजपूर येथे डीवायएसपी पदाचा कार्यभार सांभाळत होत्या. आता राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी व्यंकटेश भट, उपसचिव यांच्या सहीने काही सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात अन्नपूर्णा सिंह यांना औरंगाबाद ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आली आहे.

Next Post
अतिक्रमण प्रकरणी सरपंचावर अपात्रतेची कारवाई

अतिक्रमण प्रकरणी सरपंचावर अपात्रतेची कारवाई

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add