• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात ; पत्नी ठार, पती-मुलगी जखमी

धरणगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात ; पत्नी ठार, पती-मुलगी जखमी

धरणगाव, (प्रतिनिधी) : येथील एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगरजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर पतीसह लहान मुलगी आणि दुसऱ्या दुचाकीवरील आणखी १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर येथे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलीक मराठे (वय-३५, रा. बोरखेडा बुद्रुक) तर दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (वय-४५), शानुबाई राकेश बारेला (वय-३५) आणि त्यांची कान्हाबाई राकेश बारेला (वय-५, मुलगी रा.चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या महिलेवर धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

त्यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना रूग्णवाहिकेने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; धरणगाव तालुक्यातील घटना

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; धरणगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर
गुन्हे

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

April 24, 2026
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर
क्रिडा

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

April 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group