• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ल्याचा प्रयत्न ; खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 23, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बळीरामपेठ भागात ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या अशोक पाटील यांना वारंवार धमकावून खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित निर्भय ऊर्फ गोट्या रविंद्र पाटील याने ऑटोरिक्षा भाड्याने करून देण्यास सांगून त्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दत्तात्रेय नगरात राहणारे अशोक पाटील यांचा बळीराम पेठेत ओम साईराम ट्रान्सपोर्ट नावाने ऑफिस आहे. संशयित निर्भय उर्फ गोट्या पाटील हा नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दादागिरी करुन वेळोवेळी पैसे मागत होता. दरम्यान अशोक पाटील हे देखील त्याला पैसे देत वेळोवेळी मदत करत होते. बुधवार दि. १९ रोजी त्याने शिवजयंतीसाठी ऑटोरिक्षा करून देण्याची मागणी अशोक पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी त्याच्या ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने करून दिली.

मात्र, आरोपीने ऑटोरिक्षाचे ८०० रुपये भाडे देण्याचा आग्रह धरला, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकावले. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित गोट्या पाटील हा ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आला. त्याने गटारीवरील लोखंडी जाळी फेकून दिली आणि येथे ट्रान्सपोर्ट चालू ठेवायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता पाटील यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याने पुन्हा शिवीगाळ करत धमकावले.

व्यावसायीक अशोक पाटील यांनी आपल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी जितू पाटील यांना माहिती दिली. काही वेळाने आरोपी गोट्या पाटील हा लोखंडी सुरा घेऊन पाटील व त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी पोलिस हवालदार उमेश भांडारकर यांनी वेळीच पोहोचून आरोपीला निःशस्त्र केले आणि त्याच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. झटापटीत आरोपीच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Next Post
अल्पवयीन मुलाचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

अल्पवयीन मुलाचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर
गुन्हे

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

April 24, 2026
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर
क्रिडा

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

April 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group