• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशात भेट देणार

भोपाळ येथे आदिवासी गौरव दिवस महासंमेलनाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2021
in राष्ट्रीय
0
पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशात भेट देणार

नवी दिल्ली, दि.14 – भारत सरकार 15 नोव्हेंबर ही अमर शहीद भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करत आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथील जांबुरी मैदान येथे आदिवासी गौरव दिवस महासंमेलनात सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशला भेट देतील, तेथे ते दुपारी 1 वाजता आदिवासी  समाजासाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करणार आहेत.

आदिवासी गौरव दिवस महासंमेलनात पंतप्रधान मध्य प्रदेशात ‘रेशन आपके ग्राम’ योजनेचा आरंभ करतील. शिधा सामान घेण्यासाठी रास्त भाव दुकानात जायला लागू नये, यादृष्टीने आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना दर महिन्याला त्यांच्या स्वतःच्या गावातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून शिधा सामानाचा निश्चित केलेला मासिक हिस्सा वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या महासंमेलनादरम्यान, मध्यप्रदेश सिकलसेल (हिमोग्लोबिनोपॅथी) अभियानाच्या प्रारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान लाभार्थ्यांना जनुकीय समुपदेशन ओळखपत्र देखील सुपूर्द करतील. मध्य प्रदेशातील आदिवासी  समुदायामध्ये तीव्र प्रमाणात आढळणाऱ्या सिकलसेल ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि इतर हिमोग्लोबिनोपॅथीने ग्रस्त रुग्णांची तपासणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी आणि या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हे अभियान  विकसित करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडीशा, त्रिपुरा, दादरा आणि नगर हवेली तसेच  दमण आणि दीव या  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह  देशभरातील 50 एकलव्य आदर्श निवासी शाळांची  पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

आदिवासी  बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि  स्वातंत्र्यलढ्यातील मध्य प्रदेशातील आदिवासी  समाजातील हुतात्मा आणि शूरवीरांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. ते नवनियुक्त विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांतील (PVTG)  शिक्षकांना नियुक्ती पत्रेही सुपूर्द करतील.

या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य एम सिंदीया, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद एस पटेल, फग्गन सिंग कुलस्ते आणि डॉ. एल मुरुगन हे देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान, पुनर्विकसित राणी कमलापती रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार असून मध्य प्रदेशातील रेल्वेच्या अनेक उपक्रमांचा ते शुभारंभ करतील.

 

Next Post
अनोख्या पद्धतीने आईने साजरा केला मुलांचा वाढदिवस

अनोख्या पद्धतीने आईने साजरा केला मुलांचा वाढदिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.