जळगाव, (प्रतिनिधी) : सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वरवेध फाउंडेशनतर्फे दि.२३ ते ३० जानेवारी दरम्यान शहरातील भाऊंच्या उद्यानात सायंकाळी सांगीतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेतर्फे गेल्या १० वर्षापासुन विविध सांगीतीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने संस्था प्रयत्न करीत असून यासाठी वेळोवेळी पद्मश्री भवरलाल जैन अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे सहकार्य मिळत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कार्यक्रमात नवोदित संगीत शिक्षण प्राप्त गायक, वादक तसेच नवे, जुने अनुभवी गायक यांना सोबत घेऊन प्रथमच छोटेखानी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भक्तीगीत अभंग नाट्यगीत बंदीशी देशभक्ती गीत आदी कला सादर केली जाणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त संख्येने जळगावकर रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.