• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जि.प. शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज.. – मंत्री गुलाबराव पाटील

जळगावात ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
जि.प. शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज.. – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय प्रदर्शन हे सुरुवात मानून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोड चा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उद्घाटन पार पडले.

मान्यवरांनी सर्वप्रथम सरस्वती पूजन दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर विविध शालेय खेळ व प्रयोगात्मक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन शोध, प्रयोग व तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरणे केली आहेत. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक विचारसरणीला धार देण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली असून, भविष्यात विज्ञान क्षेत्रात अधिक आवडीचे काम करायला प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरला असून यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक गती मिळवण्याची अपेक्षा आहे.

यावेळी डायटचे प्राचार्य अनिल झोपे, जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ई. आर. शेख, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिणी चव्हाण, गट विकास अधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन एफ चौधरी, ज्ञानेश्वर सोनवणे, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी डी धाडी, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ किशोर राजे, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, उपाध्यक्ष एस डी पाटील, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, शालेय व्यवस्थापन समिती व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव आदींचे या समारंभाला उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या कल्पनांना कृतीत उतरवून विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. रोबोटव्दारे आलेल्या कात्रीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ५२ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


 

Next Post
जुन्यावादातुन तरुणाची हत्या ; ७ जण गंभीर जखमी

जुन्यावादातुन तरुणाची हत्या ; ७ जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group