• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रलंबित कामे पुढील काळात पूर्ण करण्याचा मानस.. – आ.राजुमामा भोळे

साधेपणा, प्रामाणिकपणा, महायुतीचे संघटन या बळावर आ.भोळेंना मिळाला मोठा विजय !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रलंबित कामे पुढील काळात पूर्ण करण्याचा मानस.. – आ.राजुमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचा विजय हा महायुतीच्या संघटनाचा आणि जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाचा असल्याचे दिसून आले आहे. पुढील काळात पाठपुरावा करून प्रलंबित कामे पूर्ण केले जातील, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारासाठी कुठल्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. तसेच कुठलीही मोठी रॅली काढण्यात आली नाही. कुठल्याही सेलिब्रेटीचा रोड शो आयोजित झाला नाही. तरीही आ.राजूमामा भोळे यांनी केवळ दहा वर्षात केलेल्या विकास कामांना समोर ठेवून जनतेकडे मते मागितली. मी ५० टक्के कामे पूर्ण केली असून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. उर्वरित २५ टक्के कामे आगामी काळात मी पूर्ण करेल अशी भूमिका प्रामाणिकपणे आ. राजूमामा भोळे जनतेपुढे मांडत होते. आ. राजूमामांचा हाच स्वभाव जनतेला भावला.

आ. राजूमामा भोळे हे जनतेला त्यांच्या कार्यालयामध्ये सहज उपलब्ध होतात. जनतेची कामे ऐकण्यासाठी व ते पूर्ण करण्यासाठी आ. राजूमामा भोळे प्रत्यक्ष नागरिकांना माहिती देत असतात. संपूर्ण जळगाव शहरांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. मतदारसंघात १० वर्षात त्यांनी कामे केली आहेत. शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी स्वतः यंत्रणा राबवली. तसेच केंद्रीय व राज्याच्या विविध योजनांसाठी स्वतःच्या कार्यालयातील कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांच्या कामी येणारा व विधानसभेत शहराचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ. राजूमामा भोळे यांची ख्याती आहे.

आ.राजूमामा भोळे यांनी प्रचारामध्ये टीकाटिपणी तसेच आरोप करण्यापेक्षा सकारात्मक प्रचार कसा होईल यावर भर दिला. उड्डाणपूल, रस्त्यांचे कामे तसेच एमआयडीसी असे विविध मुद्दे जनतेला सांगून आशीर्वाद मागितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भावनिक आवाहन केले. विधानसभेत परिवर्तन हा मुद्दा जळगाव शहरात दिसूनच आला नाही. जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारे तसेच स्वच्छ प्रतिमेचे म्हणून आ. राजूमामा भोळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच आता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यानंतर आ. सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा यांच्या विजयाची परंपरा तिसऱ्यांदा देखील कायम राहिली आहे. तब्बल ८७ हजार ५०९ मताधिक्याने आमदार भोळे विजयी झाले आहेत.


 

Tags: #political
Next Post
पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा.. – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा.. - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add