• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा.. – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा.. – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : पाच वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु गणनेच्या माध्यमातून विविध भागात असलेले पशुधन त्यांची परिस्थिती करावयाच्या उपायोजना या सर्व बाबींचे आकलन होत असल्याने पशु गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पशु गणना प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप झोळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मास्टर ट्रेनर डॉ. अमित कुमार दुबे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पशु गणनेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती मिळते. पशु प्राणी यांची काळजी कशी घ्यावी याची देखील माहिती या निमित्ताने पुढे येते. पशुगणना हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने पशु गणना ही सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावी. पशु गणना करताना गाव खेड्यावरील एकही पशु सुटणार नाही याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. गाव खेड्यावरील प्रत्येक गोठ्यापर्यंत जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशु गणना करणे आवश्यक असल्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की २५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या पशुगणनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पशुंविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. पशुगणनेच्या माध्यमातून विविध जाती प्रजातींच्या पशूंची गणना होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात असलेल्या पशुधनाची आकडेवारी पुढे येणार आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा दुग्ध व्यवसाय तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने देखील पशुधनांना अत्यंत महत्त्वाची आहे. २१ वी पशुगणना ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे गणना करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात त बुलढाणा येथून खास उपस्थित असलेले मास्टर ट्रेनर डॉ. अमितकुमार दुबे यांनी पशु गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

Next Post
संत ज्ञानेश्वर चौकात ‘दीपोत्सव’ सोहळा रंगला 

संत ज्ञानेश्वर चौकात ‘दीपोत्सव’ सोहळा रंगला 

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add