पारोळा, (प्रतिनिधी) : महायुतीच्या शिवसेना (शिंदे गटा)चे पारोळा-एरंडोल मतदार संघातील अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
गुरुवार दि.७ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामात बद्दल प्रभावित होऊन एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पारोळा एरंडोल मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना पाठिंबा दर्शवित जाहीर पाठींबा बाबतचे पत्रक सुपुर्द केले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा सदस्य अमोल पाटील, शेखर पाटील आदींसह महासंघाचे पदाधिकारी तसेच जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणाल महाजन उपस्थित होते.