जळगाव, दि.१३ : शहरातील गांधीनगर मधील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळातर्फे यावर्षी तामिळनाडू मधील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारली असून गणेशाची विलोभनीय मूर्ती हे आकर्षण आहे.
शहरातील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ गांधीनगर परिसर हे मंडळ दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक देखाव्यांवर भर देत असून, मागील ३३ वर्षापासून अविरतपणे जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ नाविन्यपूर्ण देखावे सजीव आरास, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी मंदिर प्रतिकृती कोल्हापूर, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, इस्कॉन मंदिर सिद्धिविनायक देवस्थान मुंबई, मंगेशी मंदिर गोवा, तुळजाभवानी माता मंदिर तुळजापूर, गाणगापूर येथील दत्त मंदिराची प्रतिकृती यासह अनेक समाजउपयोगी उपक्रम नेहमी राबवले जातात.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख व नारायण खडके हे असून यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी दीपक माळी तर उपाध्यक्ष विक्की सैंदाणे तर सचिव म्हणून गणेश कापडे यांची तर सदस्य म्हणून देवेश माळी, सागर विसपुते, प्रमोद सोनी, मयूर वाघ, देवेंद्र मराठे, हरीश नारखेडे, अमोल पाटील, विजय देशमुख, सुनील सपके, उदय वराडे, मयूर सैंदाणे, सल्लागार कैलास पाटील, धर्मेंद्र चंदनकर, दीपक वाणी, ईश्वर राजपूत, अभय सोमाणी, महेश तळेले, शंकर जवळे, प्रदीप झोपे यांची निवड करण्यात आली आहे.