• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 6, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५०७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांनामधील आवश्यकता असणाऱ्यांसाठी ७५० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.

कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३५८, फूड पार्क डिव्हाईन पार्क १०१, अलवर ०४ चित्तूर ११, बडोदा १४, हैदराबाद १९ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. यामध्ये जैन प्लास्टीक पार्क मधील सहकारी संगिता खंबायत यांनी हरतालिकेचे व्रत असतानासुद्धा रक्तदान करुन महिलांना रक्तदानाविषयी प्रेरणा दिली.

प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्यूकल्चर प्लान्ट फॅक्टरी व जैन फूडमॉल या सहकाऱ्यांसाठी प्लास्टिक पार्कच्या डेमोहॉल (ज्ञानलय), अॅग्रीपार्क, फूडपार्क, एनर्जीपार्क व डिव्हाईनपार्कच्या सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या दवाखान्याच्या वरच्या हॉलमध्ये रक्तदानाची सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान व्यवस्था करण्यात आलेली होती. जळगाव सिव्हील हॉस्पीटल, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्त संकलन केले.

‘रक्तदाता-एक जीवनरक्षक’ यानुसार लोकांना संकट काळात जीवनदान देणारे हे मानवतेचे पुजारी, अशा लोकांना मदत करतात की, जेथे जात, धर्म, पंथ आणि इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न होता गरजूंना जीवन प्रदान केले जाते. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या पासून सुरु झालेल्या सामाजिक कार्यामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा कंपनीला अभिमान आहे. सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कंपनीचे नाव जेव्हा-जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. त्यासाठी संपूर्ण जैन कुटुंबीय नेहमीच प्रयत्नशील असतात. मातृतुल्य अशा सौ. कांताई जैन यांच्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे त्याचेच एक प्रतीक होय.

७५० जणांनी घेतला मिष्टान्नाचा लाभ..

सौ. कांताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधीकॉलनीतील अंध शाळा, सावखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रम त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन दिले गेले. जैन इरिगेशनच्या राजाभोज विभागातील सहकाऱ्यांनी भोजन वाटप केले.

Tags: Jalgaon
Next Post
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group