• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेततळे कामाचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाखांत फसवणूक

व्ही. डी. पाटील यांचे सह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2024
in गुन्हे
0
शेततळे कामाचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाखांत फसवणूक

जळगाव | दि.१४ जुलै २०२४ | शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवृत्त अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव न्यायालयाने दिले आहेत. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे अंतर्गत विविध कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाने ४५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलायं.

यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन अजय बडे यांनी सविस्तर माहिती दिली. जळगाव येथील व्यावसायिक अजय भागवत बढे यांना तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे अंतर्गत शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे सांगून निवृत्त वरिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, तीन सनदी लेखापाल, कंपनीचे संचालक व अन्य दोघे जण यांनी संगनमत करून त्यांचेकडून ४५ लाख रुपये घेतले होते. विशेष म्हणजे अत्यंत चलाखीने व नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींनी अजय बढे यांना सीएसआर फंड मिळवण्यासाठी चंदिगढ, मुंबई येथे नेवून ४५ लाख रुपये उकळले. मात्र, संबंधितांनी पैसे उकळून देखील शेततळे कामांचा ठेका मिळवून दिला नाही व घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अजय बढे यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज केले होते.

मात्र, या अर्जावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची समक्ष भेट घेवून तक्रार केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधिक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणात तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव येथील निवृत्त वरिष्ठ अभियंता व्हि. डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, सुहास भट (सनदी लेखापाल), सूर्या चौहान (संचालक-गोल्ड रिव्हर कंपनी, मुंबई), पंकज नेमाडे, ललित चौधरी, पवन कोलते (सनदी लेखापाल), व्हि. के. जैन (सनदी लेखापाल) यांच्या विरोधात बडे यांनी न्यायालयात दाद मागितली होती त्यावर न्यायालयाने मंगळवारी आदेश दिले.

अजय बढे यांनी जळगाव न्यायालयांत धाव घेवून संगनमत करून ४५ लाखात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्व कागदपत्रे व परिस्थिती लक्षात घेवून जळगाव न्यायालयाने वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती जानव्ही केळकर यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


 

Next Post
शिरसोली रस्त्यावर कार अपघातात एक तरुण जागीच ठार ; तर तीन जखमी

शिरसोली रस्त्यावर कार अपघातात एक तरुण जागीच ठार ; तर तीन जखमी

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add