• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण

जळगाव, दि.०६ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन शनिवार दिनांक ६ एप्रिल रोजी शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण क्षेत्रात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एकूण २१९१ कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या सात मुद्द्यांच्या आधारे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची प्रक्रिया, मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाची कामे, मतदान प्रक्रियेतील अडीअडचणी, व पारदर्शक मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात प्रथम टप्प्यात मतदान अधिकारी व सहाय्यक मतदान अधिकारी यांचे तर दुसऱ्या टप्प्यात इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. शनिवारी आयोजित दोन्ही टप्प्यातील प्रशिक्षणाला जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एकूण २१९१ कर्मचारी हजर होते. हे प्रशिक्षण जळगाव विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार शितल राजपूत, जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहआयुक्त निर्मला गायकवाड, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी नायब तहसीलदार राहुल वाघ, श्री.चंदनकर यांनी मदत केली.प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत. अशी माहिती जळगाव शहराच्या तहसीलदार शितल राजपूत यांनी दिली.

Next Post
‘सांज पाडवा’ ने केले जळगावकर रसिकांना मंत्रमुग्ध

'सांज पाडवा' ने केले जळगावकर रसिकांना मंत्रमुग्ध

ताज्या बातम्या

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group