• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

नागपूरच्या ‘मॅस्टाकॉन-२०२६’ मध्ये आयएमए जळगावचा राज्यस्तरावर डंका; शाखेलाही ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच’ पुरस्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 16, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

जळगाव , प्रतिनिधी : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६)’ हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील आयएमए हाऊस येथे आयोजित ६६ व्या वार्षिक राज्य परिषद ‘मॅस्टाकॉन-२०२६’ व ‘आयएमएकॉन-२०२६’ या भव्य सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे आयएमए जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन व पदग्रहण समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाशजी फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. भरत बोरोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (MMC) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय कदम, एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, राज्याचे मावळते सचिव डॉ. विक्रांत देसाई तसेच कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिट्टे यांची विशेष उपस्थिती होती.

वैद्यकीय क्षेत्रातील संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी, डॉक्टरांना एकत्रित आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आयएमएच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय योगदान या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. बोरोले यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

यंदाच्या राज्यस्तरीय परिषदेत आयएमए जळगाव शाखेने घवघवीत यश संपादन केले. डॉ. भरत बोरोले यांच्या ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कारासोबतच जळगाव शाखेतील डॉ. अनिता भोळे, डॉ. लीना पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि डॉ. निरंजन चव्हाण यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्याची दखल घेत आयएमए जळगाव शाखेला ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. त्यामुळे यंदाची राज्य परिषद आयएमए जळगावसाठी विशेष अभिमानाची आणि यशाची ठरली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. भरत बोरोले यांनी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण आयएमए जळगाव परिवाराच्या एकजुटीचा, सहकार्याचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. विलास भोळे, डॉ. अनिता भोळे, डॉ. स्नेहल फेगडे तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य आणि संपूर्ण टीम यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

डॉ. बोरोले यांच्यासह जळगावच्या अन्य डॉक्टरांचा झालेला गौरव आणि आयएमए जळगाव शाखेला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार यामुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी सर्व पुरस्कारप्राप्त डॉक्टरांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 


 

Next Post
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

ताज्या बातम्या

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
जळगाव जिल्हा

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
खान्देश

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य
गुन्हे

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य

November 16, 2026
सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती
जळगाव जिल्हा

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

November 15, 2026
जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

November 15, 2026
भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी
Uncategorized

भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी

November 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add