• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

दंडात्मक कारवाई, नोटिसा आणि उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 16, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

दंडात्मक कारवाई, नोटिसा आणि उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या महासभेतील ठरावाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने महापौर कार्यालयात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

महासभेत नगरसेवकांसह नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित विभागाने आजपर्यंत कोणती पावले उचलली, याची माहिती महापौरांनी मागविली आहे.

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या किती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, किती जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि अशा प्रकारची विक्री पूर्णपणे थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याचा तपशील अहवालात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महासभेतील ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नसेल, तर संबंधित विभागाने विलंब न करता आवश्यक ती कार्यवाही करावी. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करून त्यावर नियंत्रण आणावे, असेही महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित उपायुक्तांनी या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल तातडीने महापौर कार्यालयाकडे सादर करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
जळगाव जिल्हा

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
खान्देश

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य
गुन्हे

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य

November 16, 2026
सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती
जळगाव जिल्हा

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

November 15, 2026
जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

November 15, 2026
भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी
Uncategorized

भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी

November 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add