• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : असोदा रोड परिसरात घरामागील खुली वायर कट करताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने मुलगा आणि त्याला वाचवण्यासाठी धावलेली आई अशा माय-लेकाचा उपचारापूर्वीच जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ​सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड, जळगाव) असे मृत माय-लेकाची नावे आहे.

मंगळवारी सकाळी असोदा रोड येथील राहत्या घरामागे खुली वायर कट करण्यासाठी राहुल सपकाळे गेले होते. यादरम्यान अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. मुलाला पाहताच आई सुनंदा सपकाळे यांनी त्याला वाचवण्यासाठी त्वरित धाव घेतली. मात्र, मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघेही गंभीर जखमी झाले.

​घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दोन्ही माय-लेकांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. एकाच घरातील माय-लेकाचा असा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अचानक घडलेल्या या दोन मृत्यूंमुळे मयत महिलेचे पती राजू सपकाळे व इतर कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.


 

ताज्या बातम्या

जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू
जळगाव जिल्हा

जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

November 17, 2026
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक
गुन्हे

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार
जळगाव जिल्हा

भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार

November 17, 2026
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
जळगाव जिल्हा

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
आरोग्य

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य
गुन्हे

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य

November 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add