• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला

ग्रँडमास्टर अभिजित कुंटेनी भरला खेळाडूंमध्ये जोश, तर पालकांचा अशोक जैन यांच्याशी मुक्तसंवाद...

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 30, 2023
in क्रिडा
0
राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला

जळगाव, दि.३० – जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा काल चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी पाचवी फेरी खेळवण्यात आली. मुलांच्या गटातील पहिल्या पटावर आंध्राच्या इम्रानने अवघ्या १५ चालीतच हरयाणाच्या अर्शदीप वर विजय संपादन केला, दुसऱ्या पटावर पारस ने डाव अनिर्णीत अवस्थेकडे झुकवला. त्याच बरोबर तिसऱ्या पटावरील सामन्यात महाराष्ट्राच्या कुशाग्रने मयंक बरोबर डाव अनिर्णीत ठेवण्याची संधी देखील त्याला गमवावी लागली.

चौथ्या पटावर कर्नाटकच्या अक्षतने खेळलेल्या निमझोविच लार्सन हल्ल्यापुढे मृत्युंजयला शरणागती पत्करावी लागली. पाचव्या पटावर प.बंगालचा सम्यक व तेलंगणाच्या पवन ने ५९ चालिमध्ये बरोबरी मान्य केली तर, सहाव्या पटावर ३.५ गुणांसह खेळत असलेल्या दिल्लीच्या दक्ष गोयल ने सुरवातीपासूनच आक्रमक चाली रचल्याने अदक बिवोर ने हार मान्य केली. पाचव्या फेरी अखेर आंध्राचा फिडे मास्टर इम्रान ५ गुणांसह निर्विवादपणे आघाडीवर असून आसाम चा अग्रमानांकित मयंक, महाराष्ट्राचा पारस, दिल्लीचा दक्ष गोयल आणि कर्नाटकाचा अक्षत सुरेका साडे चार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

मुलींच्या गटात, पहिल्या पटावर महाराष्ट्राच्या संनीद्धी भट ने आंध्र प्रदेशच्या आमुक्ता गुंतकाचा पराभव करत आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या पटावर उत्तर प्रदेशच्या शुभी गुप्ताने केरळच्या अनुपमा श्री कुमारचा स्लाव बचाव मोडून काढला. तर तिसऱ्या पटावर जागृती कुमारी ने अचूक चाल खेळत सामना खिशात घातला. चौथ्या पटावर उत्तराखंडच्या शेराली पटनाईक हीस अग्रमानांकित मृत्तिकाला हरवण्याच्या अनेक संधी प्राप्त झाल्या पण स्पर्धात्मक अनुभव कमी पडल्याने तिला बरोबरी स्वीकारावी लागली.

पाचव्या फेरिअखेर संनिद्धी भट ५ गुणांसह आघाडीवर असून साडेचार गुणांसह शुभीं गुप्ता, सपर्या घोष द्वितीय स्थानांवर आहेत, ४ गुणांसह अजून ५ खेळाडू संयुक्तरित्या तृतीय स्थानावर आहेत. दोन्ही गटातील पहिल्या १० डावांचे थेट प्रक्षेपण चालू असून प्रेक्षक तासनतास विविध चालिंचे विश्लेषण करण्यात गुंगून जात आहेत. स्पर्धेतील पाच फेऱ्या संपल्या असून अजून स्पर्धेतील ६ फेऱ्या शिल्लक आहेत.

▪️खेळभावना सर्वाच्चस्थानी – अभिजीत कुंटे..
भारतीय राष्ट्रीय चेस संघाचे मुख्य निवडकर्ता, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी सहभागी खेळाडूंना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांशी संवाद साधतांना म्हटले की, ‘मला आशा आहे की तुम्ही सर्व जैन इरिगेशन सिस्टीम लि. च्या आदरतीथ्याने नक्कीच आनंदी असाल, हे नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण तुमची मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असेलच. आपण नेहमी खेळभावना सर्वोच्च स्थानी कायम ठेवून स्पर्धा करत राहावे ज्यामुळे आपले व्यक्तिमत्वालाही त्याला लाभ होतो. आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करावे. यासह त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

▪️अशोक जैन यांच्याशी पालकांच्या दिलखुलास गप्पा..
जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याशी स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अनेकांनी त्यांच्या आयोजनाविषयी तोंडभरून कौतुक केले तर काहींनी त्यांना मिळत असलेल्या आदरातिथ्यासाठी अशोक जैन यांचे आभार व्यक्त केले. यासह काहींनी अश्या स्पर्धा कायम तुमच्याकडे आयोजित केल्या जाव्यात असा अट्टाहास केला. यावेळी हिमाचल प्रदेश येथील स्पर्धकाच्या पालकांनी हिमाचल मध्ये चेससाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन तेथेही प्रचार प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


Next Post
भाजपातर्फे “घर तिथे रांगोळी” स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

भाजपातर्फे "घर तिथे रांगोळी" स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group