जळगाव, दि. ३० – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महिला सशक्तीकरण अंतर्गत चालू असलेल्या “बेटी बचाव, बेटी पढाव” अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी, जळगांव महानगर तर्फे “घर तिथे रांगोळी” या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील महिला भगिनींनी उस्पूर्तपणे सहभाग नोंदवला. दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान आमदार भोळे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, माजी महापौर सीमा भोळे, महिला मोर्चा लोकसभा समन्वयक देवयानी ठाकरे, सचिव रेखा वर्मा, बेटी बचाव बेटी पढाव महानगर संयोजिका निला चौधरी, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, नीतू परदेशी, सुधा काबरा, उषा पाठक, ज्योती बर्गे, रेखा राणा, रेखा पाटील माजी नगरसेविका शुचिता हाडा, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदींसह भाजपच्या महिला पदाधिकारी, माजी नगरसेविका व स्पर्धक महिला उपस्थित होत्या.