• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 1, 2023
in जळगाव जिल्हा
0
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जळगाव, दि.०१ – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत देशभरातील विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून यासंदर्भात जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी खान्देश प्रभातशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

आज केंद्र सरकारने मांडलेलं बजेट शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी चांगलं बजेट आहे. असं मी म्हणेन. शेतकऱ्यांसाठी सप्तर्षी च्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा विनीयोग करायचा ठरवले आणि फायदा घ्यायचा ठरवला तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याची माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण कुठे काय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच पायाभुत सुविधांसाठी खूप मोठा पैसा सरकारने दिला आहे.

पायाभूत सुविधा म्हटल्या म्हणजे त्यात रेल्वेचे जाळं, महामार्ग, पोर्ट, विमानतळे आले, त्यानंतर भुयारी बोगदे आले, ब्रिजेज आले. यामुळे दळणवळण चांगले होणार आहे. परंतू यातून रोजगार निर्मिती मोठ्याप्रमाणात आताही झालेली आहे आणि पुढेही जास्त प्रमाणात होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचा समावेश यामध्ये केला आहे. संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.

जलजीवन हर घर पेयजल देण्याचं जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून पाहिले आणि त्यावर त्यांनी सातत्याने काम करणे सुरू केले आहे. याविषयाचा सर्व नागरिकांना फायदा होतो आहे. हे आम्ही या क्षेत्रात असल्याने दिसून येतो आहे. आणि याच भावनेतून त्यांनी या योजनेचे बजेट 60 हजार कोटींवरून 70 हजार कोटींवर नेले ही मोठी बाब आहे. यामुळे प्लास्टिक उद्योगालाही चांगले दिवस येणार आणि त्यासह शेतकऱ्यांना, नागरिकांना पेयजल मिळेल हे अधिक महत्त्वाचे वाटते.

त्यासोबत शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन सारख्या विविध योजनांना गतिमान करण्यासाठी जास्त तरतूद केली आहे. डिजीटल अॅग्रिकल्चर ही कन्सेप्ट सरकारने आणण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे ही चांगली बाब आहे. यात आमच्या कंपनीनेसुद्धा सुरुवात केलेली आहे. अॅग्रीटेक किंवा डिजिटल इन अॅग्रिकल्चर हे शेतकरी आत्मसात करायला लागले आहेत. सध्या निवडक शेतकरी याचा उपयोग करत असून पुढील काळात ही संख्या वाढेल. यामुळे उत्पादन क्षमता वाढून भारताचे नाव या क्षेत्रात अधिक उंचीवर जाईल.

सोबतच हरित क्रांती ही फक्त शेतीमध्येच आतापर्यंत बोलली जात होती परंतु यापुढे ती वाहनांमध्ये येणार आहे. इंधन आतापर्यंत कोळशापासून वेगवेगळ्या माध्यमांपासून बनत होते परंतु सोलरला त्यांनी हरित ऊर्जेत घेतलेले आहे. त्या सोबतच हायड्रोजनचे फ्युएलवर बसेस, ट्रक्स धावणार आहेत. बॅटरी ऑपरेटेड कार्स येत आहेत. इंधनाबाबत एक मोठेपाऊल भारताने उचलले आहे. जगाच्या पाठीवर भारत जगाच्या बरोबर सर्व क्षेत्रात येत आहे. त्यासाठी भारताचे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, उद्योजक जोमाने कामाला लागलेले आहेत. ह्या वर्षाचे बजेट खूप चांगल्या पद्धतीने सरकारने सादर केलेले आहे. सगळ्यांच्या जीवनात फायदा होणार आहे. सर्व सामान्यांसाठी जे काही टॅक्स बेनिफीट दिलेले आहेत अपेक्षेपेक्षा कमी आहेत परंतु त्यांनी काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जास्त देण्याचा प्रयत्न केला असता तर मध्यमवर्गीय, नोकरदार, सर्वसामान्य वर्ग अजून आनंदी झाला असता. अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.

 


Next Post
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

शानबाग विद्यालयात ‘गाईड’ एकांकिकेतून विद्यार्थ्यांना विठ्ठल वारीचा भावस्पर्शी अनुभव
जळगाव जिल्हा

शानबाग विद्यालयात ‘गाईड’ एकांकिकेतून विद्यार्थ्यांना विठ्ठल वारीचा भावस्पर्शी अनुभव

July 31, 2025
आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन
महाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन

July 30, 2025
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव जिल्हा

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

July 30, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम

July 30, 2025
जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!
क्रिडा

जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!

July 29, 2025
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

July 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group