जळगाव, दि.०२ – शिवसेनेच्या महिला आघाडीचे संघटन मजबूत व्हावे यासाठी महीला आघाडीच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख अंजली नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महीला आघाडीची बैठक जळगावात संपन्न झाली. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख अंजली नाईक या जळगाव दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांच्या उपस्थितीत महीला आघाडीची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. त्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे महीला सक्षमीकरण व रोजगार यासह विविध विषयावर नाईक यांनी मार्गदर्शन केले.
सादर बैठक शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर येथील महिला बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीत विविध स्तरातील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महीला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, तालुका प्रमुख उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान महापौर जयश्री महाजन, निलेश चौधरी, गुलाबराव वाघ, अंजली नाईक आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम राजपूत व गायत्री सोनवणे यांनी तर प्रास्ताविक जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांनी केले. आभार मनिषा पाटील यांनी मानले.