• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचा संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेत विजेता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 22, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनचा संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेत विजेता

मुंबई, दि.२१ – मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ‘ड’ गटात अंतिम सामना जैन इरिगेशन ‘ब’ संघ विरुद्ध महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यात खेळण्यात आला. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजीसाठी महेंद्र लॉजिस्टिक संघाला आमंत्रित केले.

प्रथम फलंदाजी करत महेंद्र लॉजिस्टिक्स संघाने ३० षटकात सर्व गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात समीर चालके २३ आणि अर्पित धाडवे व अभिषेक पांडे प्रत्येकी १३ धावा केल्या. गोलंदाजीत जैन इरिगेशनतर्फे कर्णधार वरुण देशपांडे यांनी ९ षटकात २६ धावा देत ५ आणि समद फल्लाह ४ व अमित गावंडे यांनी १ गडी बाद केले. प्रतिउत्तरात जैन इरगेशन ‘ब’ संघाने हे लक्ष्य केवळ २२.१ षटकात २ गडी बाद ११९ धावा करून पार केला व हा अंतिम सामना ८ गडी राखून विजय मिळवला.

फलंदाजीत प्रतीक यादव ४१ व आदित्य राजहंस नाबाद ५२ आणि हर्ष आघव नाबाद १२ धावा केल्या. महिंद्र लॉजिस्टिक संघातर्फे गोलंदाजीत साहिल मळगावकर व अभिषेक पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. या सामन्यात पाच गडी बाद करणारा जैन इरिगेशन संघाच्या कर्णधार वरुण देशपांडे सामनावीराचा मानकरी ठरला. जैन इरिगेशन ‘ब’ संघ अंतिम विजेता ठरल्यामुळे त्यांना ‘ड’ गटातून बढती मिळून पुढील स्पर्धेसाठी ते ‘क’ गटात सामील झाले आहेत.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संघाचे मार्गदर्शक मुंबईचे मयंक पारेख, अरविंद देशपांडे यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक अनंत तांबेकर, मेंटोर व वरिष्ठ खेळाडू समद फल्ला यांचे अभिनंदन केले.


 

Next Post
आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे.. – साईगोपालजी महाराज

आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे.. - साईगोपालजी महाराज

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add