गजानन पाटील | अमळनेर, दि.०४ – तालुक्यातील पाडळसरे गावात तरूणांच्या पुढाकारातुन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार मुंढे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत ‘एक गाव एक गणपती’ मंडळाची स्थापना करण्यात आली. दरम्यान तरुणांच्या कार्याचे संपूर्ण गावात कौतुक होत आहे.
पाडळसरे येथील तिरंगा गणेश मित्र मंडळाच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी गावात ‘एक गाव एक गणपती’ बसवून पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेला प्रतिसाद दिला. दरम्यान मारवड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयेश खलाने मंडळास भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
आरतीच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष गौरव पाटील, उपाध्यक्ष लोकेश गुर्जर, निलेश पाटील, संजय गुर्जर, कल्पेश पाटील, सागर पाटील यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील, पत्रकार वसंत पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, पोलीस पाटील उमाकांत पाटील, गोपाल कोळी, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, भूषण पाटील, अभिमन कोळी आदींसह तिरंगा गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.