• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाविकांचा अथर्वशीर्ष पठणाला प्रतिसाद

सुभाष चौक मित्र मंडळाचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2022
in धार्मिक
0
भाविकांचा अथर्वशीर्ष पठणाला प्रतिसाद

जळगाव, दि. ०४ – येथील सुभाष चौक मित्र मंडळ आणि स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन रविवार करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आवर्तन म्हणण्यात आली. संपूर्ण चौक परिसर मंत्रमुग्ध आणि भक्तिमय झाला होता.

भवानी माता मंदिराचे पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक अथर्वशीर्ष पठण तसेच धार्मिक विधी पार पडला. यावेळी शहरातील सुमारे ५ हजार नागरिकांनी उपस्थिती देत अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या केले.

महाआरती झाल्यानंतर भाविकांना मोदकांचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी २१ भाविकांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचा शिक्का आयोजकांच्या वतीने देण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ केंद्राचे विजय निकम, सुभाष चौक मित्र मंडळ अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, कार्याध्यक्ष अलोक अग्रवाल उपस्थित होते. हर्षल चव्हाण, महेश गोला, मयूर कासार, बापू कापडणे, हरीश चव्हाण, संजय पांडे, बबलू गहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांचा सन्मान

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांचा सन्मान

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add