• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2022
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगांव, दि.१३ – जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

तसेच स्थानिक प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनाचे पालन करावे व खबरदारी घ्यावी.
१ सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
२ नाले/ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे.
३ पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
४ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
५ जुनाट तसेच मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
६ पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये.
७ जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारेपासून सावध राहावे.
८ पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ खाऊ नये.
९ नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.
१० पिण्याचे पाणी उकळून प्यावे व जेवणाआधी हात स्वच्छ धुऊन घ्यावे.
११ अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
१२ घाट,डोंगर रस्ते, अरुंद रस्ते दरी, खोरी येथून प्रवास करणे टाळावे.
१३ धरण, नदीक्षत्रामध्ये, धबधबे डोंगर माथा, घाट ,कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.

आपत्कालीन परिस्थितीत खालील नियंत्रण कक्षात संपर्क करावा..
जिल्हा नियंत्रण कक्ष – टोल फ्री क्रमांक 1077/ 0257-2217193/ 2223180

जिल्हा पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष जळगाव – टोल फ्री क्रमांक 100/ 0257-2223333/2235232

जळगाव महानगरपालिका नियंत्रण कक्ष – टोल फ्री 101/ 102/ 0257 -2237666/0257-2224444

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव
रुग्णवाहिका टोल फ्री 108
0257-2226611


 

Next Post
ए.टी.झांबरे विद्यालयात गुरुपौर्णिमा दिवस साजरा

ए.टी.झांबरे विद्यालयात गुरुपौर्णिमा दिवस साजरा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add