• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आषाढी एकादशी निमित्त अवतरले साक्षात विठ्ठल रुखमाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 10, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
आषाढी एकादशी निमित्त अवतरले साक्षात विठ्ठल रुखमाई

अमळनेर, दि. १० – आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे ठीक ठिकाणी पूजन व पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान अमळनेर शहरातील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कुल, अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल तसेच न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कुल मधील बालगोपाल तसेच विद्यार्थी विद्यर्थीनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

यावेळी शहरातून विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा व दिंडी निघाली. अनेक बालगोपाल यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी, वारकरींचा वेश परिधान करून संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. तसेच फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सचिन खंडारे मित्रपरिवारा कडून चॉकलेट व बिस्किटे वाटप करण्यात आली.

तर दुसरीकडे ऍड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. श्री विठ्ठल पांडुरंगास अभिवादन करण्यासाठी व आजच्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि संतांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी भजन, अभंग गायन, पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी सारखी वेशभूषा साकारलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी यांनी पालखीचे पूजन केले शाळेतील शिक्षिका सुरेखा सोनगडकर, जयश्री भोसले, मंगला चौधरी ,वर्षा चुंबळकर, चारुशीला पाटील, रुचिता पाटील, अश्विनी चौधरी, देवयानी पाटील, सुरेखा सैंदाणे, जोत्स्ना भोसले, नयनतारा सैंदाणे, मुस्कान ढिगराई आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.


 

Next Post
अंनिस लोकशाही समृद्ध करण्याचे काम करते.. – विनायक सावळे, अंनिस

अंनिस लोकशाही समृद्ध करण्याचे काम करते.. - विनायक सावळे, अंनिस

ताज्या बातम्या

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या
गुन्हे

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित
गुन्हे

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

October 4, 2026
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हे

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

October 4, 2026
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 4, 2026
तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add