जळगाव, दि. १५ – खानदेशातील प्रसिध्द चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘Riflection’ अर्थात ‘प्रतिबिंब’ हे चित्र प्रदर्शनाचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे. दि. १६ मे पासून पी एन गाडगीळ ज्वेलर्सच्या आर्ट गॅलरीत सुरू होत आहे. बुद्धपौर्णीमेच्या दिवशी सायं ६ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी उद्योजक रजनीकांत कोठारी, संदिप पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही वर्षांत देशातील मसुरी, हिमालय या सोबतच्या अनेक ठिकाणी सचिन मुसळे यांनी कामे केली आहेत. त्यांच्या चित्रांची एक स्वतंत्र शैली असून ती चित्रं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करतात. चित्रकाराच्या डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग रंग, रेषातून पहायला मिळणार आहे.
यापूर्वी मुसळे यांचे औरंगाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली येथे चित्र प्रदर्शने झाली आहेत. जळगावकर चित्रं प्रेमी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन दि. १६ ते ३० मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार असून बुधवारी गॅलरी बंद असेल. रसिकांनी प्रदर्शनात भेट द्यावी अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.