• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

​जळगाव, (प्रतिनिधी) : ‘रयतेचे राजे’ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, १९ फेब्रुवारी रोजी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगाव येथे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचा निर्धार सर्व पत्रकारांनी व्यक्त केला.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी आणि महासचिव भगवान सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्यक्ष जीवनात आणि पत्रकारितेत अंमलात आणण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

​अभिवादन प्रसंगानंतर उपस्थित पत्रकारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ​याप्रसंगी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी, योगेश चौधरी, योगेश सुने, ज्येष्ठ पत्रकार लालचंद अहिरे, विकास चव्हाण, संधिपाल वानखेडे, हेमंत शर्मा, विलास सोनार, मनोज जोगी, किशोर शिंपी, मीनाक्षी चौधरी, मुजम्मिल सैय्यद यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Tags: #garjanaJalgaon
Next Post
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group