• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

​वरणगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या १५ दिवसांपासून एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या माकडाने आतापर्यंत तब्बल ३५ ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. माकडाच्या या हिंसक रूपामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, वनविभागाच्या संथ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव परिसरात माकडांची एक टोळी आली होती. त्यातील इतर माकडं निघून गेली असली, तरी एक माकड गावातच थांबले आहे. हे माकड आता हिंसक झाले असून, घरात घुसून महिला आणि वृद्धांवर अचानक झडप घालत आहे. इतकेच नव्हे तर स्वयंपाकघरातील वस्तूंची नासधूस करून हे माकड मोठे नुकसान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

माकडाच्या हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण आहे की, एका ग्रामस्थाला माकडाने घराच्या गच्चीवरून ढकलून दिले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. याशिवाय अन्य ३५ जण या माकडाच्या चाव्यामुळे जखमी झाले आहेत.

या संकटामुळे गावकरी दिवसाही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. पालकांनी भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले असून, शेतमजुरांनी शेतात जाणे टाळले आहे. आता प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन गावकऱ्यांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
​

Next Post
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add