• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 18, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शारदा कॉलनी परिसरातील टोके शाळेत लिनेस क्लब जळगाव तर्फे नुकतेच भव्य दंत चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

​या शिबिरात प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. ऋषिकेश वराडे व डॉ. उमा वराडे यांनी मुलांच्या दातांची सखोल तपासणी केली. मुलांच्या दातांच्या तक्रारी जाणून घेत, ज्या मुलांना दातांच्या समस्या होत्या त्यांना तात्काळ औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच दात निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी मुलांना प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.

​या प्रसंगी प्रभाग १३ च्या नगरसेविका सुरेखा तायडे, दिपाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व मुलांना टूथपेस्ट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी लिनेस क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

​लिनेस क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांनी मुलांशी संवाद साधत आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. “लहानपणापासूनच दातांची निगा राखल्यास भविष्यातील मोठे आजार टाळता येतात,” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका भावना पाटील यांनी शिबिराची पार्श्वभूमी स्पष्ट करत पाहुण्यांचे स्वागत केले. लिनेस क्लबच्या सेक्रेटरी नीला चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले. ​या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिनेस क्लबचे सदस्य आणि शाळेतील शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add