• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिड वर्षाच्या पूर्वाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात बालरोग तज्ञांच्या टिमला यश

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे लाखोंच्या खर्चाची बचत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 5, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
दिड वर्षाच्या पूर्वाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात बालरोग तज्ञांच्या टिमला यश

जळगाव, दि. ०५ – दिड वर्षाच्या पूर्वाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रात्री ११.३० च्या सुमारास तिला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेतील रुग्णावर निष्णात तज्ञांच्या अथक प्रयत्नांनी तब्बल २७ दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. या उपचारासाठी ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च खाजगी इस्पीतळात आला असता, मात्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेंमुळे सर्व उपचार येथे अगदी मोफत झाले.

फैजपूर तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी असलेेले मयूर महाजन यांच्या १९ महिन्याच्या पूर्वाला श्वासोच्छवासास त्रास होवू लागला. आतापर्यंत तीनवेळेस न्यूमोनियाने आजारी झालेल्या पूर्वाला हॉस्पीटलचा खर्च खूप लागला, मात्र आता काय करावे? आपले बाळावर कुठे उपचार होतील? यावर त्यांना गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जा.. तेथे अगदी मोफत उपचार होतील असे सांगितले. त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठले. यावेळी बालरोग तज्ञांनी दाखल करुन घेत सर्वप्रथम व्हेंटीलेटर लावले. बाळाची हिस्ट्री जाणून घेतली. यानंतर बाळाचा एक्स रे व एमआरआय तपासणी केली असून दोन्ही फुफुसांमध्ये न्यूमोनिया व ब्राँक्रायटीसमध्ये बदल जाणून आला. यामुळे सिस्टीक फायब्रोसिस असे प्रोव्हीजन निदान केले. आणि त्यासाठीची डेल्टा ५० एस या जिनची तपासणी जळगाव केली असता ती सुद्धा निगेटिव्ह आली.

इम्पेरिकल टिबिच्या औषधोपचाराने पूर्वाला जीवनदान..
या केससंदर्भात बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर सांगतात की, बाळ अ‍ॅडमिट केले तेव्हा वाचण्याची अजिबात चान्सेस नव्हते. मात्र चौथ्या दिवशीच बाळाचे व्हेंटीलेटर काढले आणि बाळ स्वत: श्वास घेऊ लागले. डेल्टा ५० एस या जिनची तपासणी केली असता ती निगेटीव्ह आल्याने निदान काय करावे असा प्रश्‍न पडला. त्यावेळी आरटीपीसीआर, एचआयव्ही, टीबी सीबी नॅड च्या तपासण्या केल्या मात्र त्यादेखील निगेटिव्ह येत होत्या. सर्व निगेटीव्ह असून बाळाला अधून मधून ताप येत होता. अखेरीस डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार आणि मी असे ठरविले की, इम्पेरिकल टीबीची औषधी सुरु करायचे ठरले. त्यांना डॉ.सुरुची शुक्‍ला, डॉ.प्रज्ञिल रांगणेकर, इंटर्न व नर्सिंग स्टाफनेही सहकार्य केले. आश्चर्य म्हणजे उपचाराच्या १० व्या दिवशीच बाळ प्रतिसाद द्यायला लागले. दाखल झाल्यानंतर बाळाचे वजन ६.४ झाले होते ते वाढून ६.९ किलो इतके झाले. पूर्वाची भूकही वाढली आणि ती पूर्वीप्रमाणे खेळू लागली. पुढील ६ महिने टीबीच्या औषधींचा सल्‍ला रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आला.

आमच्या बाळाची खूप चांगली काळजी घेतली..
शेतीकामावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो, पूर्वाच्याआधी एक बाळ आम्हाला होते मात्र तेही अगदी तीन महिन्यातच आजाराने गेले, त्यानंतर पूर्वा झाली मात्र मागील वर्षभरात तिला अनेकदा खाजगी इस्पीतळात दाखल केले. दवाखान्यात खूप खर्च झाला आता पूर्वाची तब्येत खरात झाली मात्र पैशांअभावी आता काय करावे असा प्रश्‍न पडला आम्हाला येथीलच डॉ.निलेश बेंडाळे यांनी येथे येण्याचा सल्‍ला दिला. आम्ही रात्रीच आलो आणि आमच्या बाळावर उपचार सुरु झाले. येथील डॉक्टर्स, नर्सेस सर्वांनीच बाळाची खूप चांगली काळजी घेतली आणि आज माझं बाळ माझ्या मांडीत पुन्हा खेळू लागल्याने मी रुग्णालयाचे आभार मानले.

– मयूर महाजन, रुग्णाचे वडील 


 

Tags: डाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group