जळगाव, दि.०२ – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन झाले.
ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात सकाळी शिवध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मेजर नाना वाणी, लता भोईटे, धीरज सोनी, अॅङ नितीन चव्हाण, अॅङ अनुराधा वाणी, मधुकर सोनार उपस्थित होते. व्यसनमुक्त, विकारमुक्त समाज घडविण्यासाठी शिवप्रतिज्ञा या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी उपस्थितांना दिली.
शिव तांडव नृत्याने भाविक भारावले
शिव महोत्सवात भगवान शिवाचे भावस्वभाव साकारणारे शिव तांडव नृत्याचे यर्थार्थ नृत्य कु. खुशी हीने या प्रसंगी सादर करुन भाविकांचे आध्यात्मिक प्रबोधन केले. याप्रसंगी कु. दिया, दुर्गेश सोनवणे यांनीही नृत्य आणि गीताने वातवरण भक्तिमय केले. सूत्रसंचलन ब्र.कु. वर्षा यांनी केले.
बारा ज्योर्तिलिंगम दर्शन
ओंकारेश्वर मंदिर परिसरात भगवान शिवाचे जागृत स्थान बारा ज्योर्तिंलिग दर्शनाचे आयोजन २८ फेब्रुवारी पासूनच करण्यात आले होते. आज शिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी राजयोग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दि. २ आणि ३ मार्च पर्यंत हे दर्शन खुले असणार आहे. असेच आयोजन निमखेडी आणि उमाळा शिवमंदिराच्या परिसरात करण्यात आले होते.