• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ब्रह्माकुमारीज् आयोजित शिवरात्री महोत्सव उत्साहात

बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
ब्रह्माकुमारीज् आयोजित शिवरात्री महोत्सव उत्साहात

जळगाव, दि.०२ – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन झाले.

ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात सकाळी शिवध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मेजर नाना वाणी, लता भोईटे, धीरज सोनी, अॅङ नितीन चव्हाण, अॅङ अनुराधा वाणी, मधुकर सोनार उपस्थित होते. व्यसनमुक्त, विकारमुक्त समाज घडविण्यासाठी शिवप्रतिज्ञा या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी उपस्थितांना दिली.

शिव तांडव नृत्याने भाविक भारावले
शिव महोत्सवात भगवान शिवाचे भावस्वभाव साकारणारे शिव तांडव नृत्याचे यर्थार्थ नृत्य कु. खुशी हीने या प्रसंगी सादर करुन भाविकांचे आध्यात्मिक प्रबोधन केले. याप्रसंगी कु. दिया, दुर्गेश सोनवणे यांनीही नृत्य आणि गीताने वातवरण भक्तिमय केले.  सूत्रसंचलन ब्र.कु. वर्षा यांनी केले.

बारा ज्योर्तिलिंगम दर्शन
ओंकारेश्वर मंदिर परिसरात भगवान शिवाचे जागृत स्थान बारा ज्योर्तिंलिग दर्शनाचे आयोजन २८ फेब्रुवारी पासूनच करण्यात आले होते. आज शिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी राजयोग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.  दि. २ आणि ३ मार्च पर्यंत हे दर्शन खुले असणार आहे.  असेच आयोजन निमखेडी आणि उमाळा शिवमंदिराच्या परिसरात करण्यात आले होते.


 

Next Post
तरूणांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

तरूणांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add