• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

आसोदा उड्डाणपुलाजवळ गळफास घेत आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव, प्रतिनिधी : प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणातून धमक्या व मानसिक त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देऊळवाडा (ता. जळगाव) येथील प्रशांत संजय सोनवणे (वय २८) याच्याबाबत घडली. आसोदा उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल महाजन आणि आई अशा तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांकडून प्रशांतला वाटेत अडवून धमकावणे, अपमानित करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशांत मानसिक विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिरामागे शेताच्या बांधावर त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.


 

Next Post
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

ताज्या बातम्या

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add