• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

संशोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

जळगाव, (प्रतिनिधी) : संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण तसेच जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ.सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रम्मुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन उत्पादन प्रकल्पामध्ये अणि संशोधन इत्यादीवर भर देण्यात आला आहे.

तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपल्ब करून देण्याची तरतूद आहे. या सहकार्यमुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रालया प्रसाराला चालना मिळणार आहे.

 


 

ताज्या बातम्या

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

October 6, 2026
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जळगाव जिल्हा

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गुन्हे

उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
कृषी

जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add